पद नसतानाही अविरत जनसेवा!
नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळाच्या माध्यमातून आणि राजकीय स्वार्थापलीकडे जाऊन, केवळ सामाजिक बांधिलकीतून जनसेवा करणाऱ्या नेतृत्व. वॉर्ड क्र. १२ मधील पायाभूत सुविधांपासून ते सांस्कृतिक वारशापर्यंत प्रत्येक कार्यात अग्रेसर.
अ. पायाभूत सुविधा व विकास
पाणीपुरवठा
भोपळे गल्ली, वरवंडे गल्ली, विळदकर गल्ली येथील अनेक वर्षांचे पाण्याचे प्रश्न सोडवले. स्वतंत्र टाक्या व बोअरवेलची सोय. पारगावी माळीवाडा येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा.
स्वच्छता व आरोग्य
पंचपीर चावडी येथील ड्रेनेज लाईनचे काम मार्गी लावले. 'स्वच्छ वॉर्ड, सुंदर शहर' अंतर्गत वॉर्डासाठी स्वतंत्र नवीन घंटागाडी उपलब्ध.
पथदिवे व सुरक्षा
वॉर्डातील विविध गल्ल्यांमध्ये बंद असलेले पथदिवे (Street Lights) तातडीने सुरू करून परिसर प्रकाशमय केला.
ब. आरोग्य आणि रुग्णसेवा
मोफत मोक्ष वाहिनी
केवळ वॉर्डासाठी नाही, तर संपूर्ण नगर शहरासाठी अंत्ययात्रेकरिता 'मोफत मोक्ष वाहिनी' (Hearse Service) सुरू केली.
रुग्णसेवा
गरजू रुग्णांसाठी अद्यावत बेड आणि ५ व्हीलचेअरची मोफत सोय.
आरोग्य शिबिरे
नवरात्रीत 'जनकल्याण रक्त केंद्र' सोबत 'मातृशक्ती आरोग्य अभियान' आणि दूषित पाण्याच्या प्रश्नावर त्वरित कार्यवाही.
क. महिला सक्षमीकरण
आनंदोत्सव
मकर संक्रांतीनिमित्त भव्य हळदी-कुंकू, होम मिनिस्टर खेळ आणि लकी ड्रॉचे आयोजन.
सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त घरोघरी जाऊन महिलांचा रोप व श्रीफळ देऊन सन्मान आणि 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश.
शासकीय योजना
पिंक ई-रिक्षा, करात सवलत यांसारख्या शासकीय योजना महिला व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत.
ड. सांस्कृतिक व धार्मिक कार्य
मंदिर जीर्णोद्धार
पावन मुंजोबा गणेश मंदिर, खिस्त गल्लीतील मुंजोबा मंदिर सुशोभीकरण आणि शनि-मारुती मंदिरासाठी ५ टन स्टील व सिमेंटची मदत.
सण-उत्सव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, हनुमान जन्मोत्सव, रामनवमी आणि गणेशोत्सवात सक्रिय सहभाग आणि महाप्रसाद/अल्पोपहार वाटप.
पुरस्कार विजेते देखावे
सामाजिक विषयांवर 'मानवी देखावे' सादर करून मनपाकडून सलग दोन वर्षे पारितोषिक प्राप्त.
इ. विशेष उपक्रम
रेशनकार्ड कॅम्प
शहरात प्रथमच ४ दिवसीय भव्य कॅम्प लावून नागरिकांना ऑनलाईन रेशनकार्ड आणि KYC ची मोफत सुविधा.
मनोरंजन व क्रीडा
नागरिकांसाठी 'छावा' चित्रपटाचा मोफत शो आणि तरुणांसाठी 'प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धे'चे आयोजन.
पद नसताना 'सेवा' केली, आता 'विकास' करण्यासाठी साथ द्या!
आजवर वैयक्तिक पातळीवर तुमची सेवा केली, आता लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे. आपल्या प्रभागाला 'स्मार्ट आणि समस्यामुक्त' करण्यासाठी मला तुमची भक्कम साथ हवी आहे.
बदल हवाय? मग साथ द्या!
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या.
चला, एक नवी सुरुवात करूया! बदलासाठी आणि शाश्वत विकासासाठी!
आपली नम्र, सौ. आरती महादेव (संग्राम) रासकर
